भाजपच्यावतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध
भाजपच्यावतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध
उमरगा दि.२१ (प्रतिनिधी) - कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला असताना हा निर्णय भाजपा सरकारने घेतल्याची दिशाभूल विरोधकाकडून होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून महाविकास आघाडीचा भाजपने निषेध करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, शहराध्यक्ष किरण रामतीर्थे,माजी नगरसेवक अरुण इगवे, इरप्पा घोडके, उमेश स्वामी, पिंटू साखरे, श्रीराम राठोड, पिंटू राठोड, सिद्धेश्वर माने, सागर पाटील, ऍड सुशील शिंदे, विठ्ठल चिकुंद्रे,शिवराज चेपळे, मुस्तफा औटी , दत्ता रोंगे, धर्मा जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.