मतदारांची नावे वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख, प्रतिनिधिंची बैठक

मतदारांची नावे वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख, प्रतिनिधिंची बैठक

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - मतदार यादीतून मंदिरासह मयत स्थलांतरित बेपत्ता दुबार मतदारांचे नाव वगळण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयात पक्षप्रमुख प्रतिनिधी यांची उमरगा तहसील कार्यालयात दि.३ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव यांच्या निर्देशानुसार व दि. २८ सप्टेंबरच्या पत्रानुसार मतदार यादीतुन मयत / स्थलांतरीत / बेपत्ता / दुबार मतदारांचे नाव वगळण्याची विहित प्रक्रिया अवलंबिण्यात येत आहे. या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख, प्रतिनिधी या मतदारांची नावे वगळण्याची विहित प्रक्रिया समजून सांगण्यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रमुख व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये तहसिलदार  गोविंद येरमे यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पत्र दि.३१ ऑगस्ट २०२३ मधील मतदार यादीतून नोंदी वगळण्या संदर्भातील नमुना ७ मधील प्राप्त अर्ज/दुबार नोंदणी/ स्थलांतरीत / मयत मतदार याबाबत सर्वसमावेशक व एकत्रित सुधारित सुचनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर मयत / स्थलांतरीत/बेपत्ता / दुबार मतदारांच्या याद्या उपस्थित राजकीय पक्ष प्रमुखांना देण्यात आल्या. तसेच आपल्या संपर्कातील सर्वांची मतदार नोंदणी होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !