येणेगुर येथे शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन

येणेगुर येथे शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन


येणेगुर दि.१३ (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात दि.१७ ऑक्टोबरपासून शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन दि.१७ ते २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.  
येणेगूर येथे श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बाबुराव बिराजदार यांच्या कल्पनेतून मागील ४३ वर्षापासून अविरत अखंड शारदोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.  व्याख्यानमालेची सुरुवात दि.१७ रोजी  कमलाकर भोसले माजी मुख्याध्यापक तथा अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा यांच्या गुरु, शिष्य या विषयाने होणार आहे. दुसरे व्याख्यान दि.१८  रोजी मच्छद्रिंनाथ शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरूम यांचे सामाजिक समस्या व कायद्याची भूमिका या विषयावर, दि.१९ रोजी प्रवीण स्वामी, मुख्याध्यापक यांचे  भारतीय संस्कृती व आपण, दि.२० रोजी जिल्हा मराठी पत्रकार संघ'चे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचे  पत्रकारिता व विद्यार्थी या विषयावर तर शेवटचे व्याख्यान  प्रा. मधुकर यादवराव गुरव यांचे  प्रवचनातून व्यक्तिमत्व विकास या  विषयावर  व्याख्यान होणार आहे. सुरुवातीचे चार व्याख्यान दुपारी २ वाजता तर शेवटचे  व्याख्यान सकाळी ९ वाजता कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगुर येथे होणार आहे.  त्यामुळे या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव, अध्यक्ष, मुख्याध्यापक व संस्कृतीक विभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !