लोहारा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच

लोहारा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच

लोहारा दि.३० (प्रतिनिधी) - मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने दररोज एका गावचे साखळी उपोषण सुरू आहे. सास्तुर येथील महिला तर नागराळ लोहारा येथील युवकांनी साखळी उपोषण केले. 
लोहारा तालुक्यातील सर्वच गावातून सकल मराठा समाज व ग्रामस्थांनी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात मंत्री, खासदार, आमदार व सर्वच विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा महत्वपूर्ण ठराव घेतला आहे. यावेळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत लोहारा येथे दररोज सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास कडाक्याच्या थंडीतही तहसील कार्यालयासमोर (दि.२५) पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तर अनेक गावांत मराठा समाजाच्या युवकांकडून साखळी उपोषण सुरू आहे.  यावेळी सास्तुरच्या सरपंच पाटील, शिला पाटील, कल्पना पाटील, अश्विनी पवार, दिपाली देशमुख, शिवाजी पवार, रोहित पुरणे, राजवर्धन पाटील, उमेश देशमुख, अतुल शिंदे, वीरेंद्र पवार, गंगाधर पवार, संभाजी पवार, दत्ता घाडगे, बाळासाहेब पाटील, सुशांत शिंदे, रमेश वाघुळे, बाळासाहेब गोरे, भागवत गरड, सचिन भरारे, शहाजी जाधव, कान्हा वाघ, किरण चिंचोले, अविनाश गोरे, नगरसेविका कमल भरारे यांच्यासह आदींनी सहभाग घेतला. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !