नॅचरल शुगरच्या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन घटस्थापना दिनी

नॅचरल शुगरच्या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन घटस्थापना दिनी


रांजणी दि.१६ (प्रतिनिधी) - नॅचरल शुगरच्या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक राजपाल माने व त्यांच्या पत्नी अंजलीताई यांच्या हस्ते विधीवत बॉयलरची पूजा करून आणि नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली घटस्थापना दि‌१५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
नॅचरल शुगरच्या माध्यमातून या पंचक्रोशितील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम उभारून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा अथक प्रयत्न यापूर्वी केला आहे. यापुढे देखील करतच राहणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांनी सांगितले.
साखर कारखान्या पुढील भविष्यकाळात भेडसावणा, ऊस टंचाईच्या समस्या व त्यावर उपाययोजना करणयासाठी स्वीट सोरगमचा (गोड ज्वारी) पेरा कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये करून त्याचा ईथेनॉल निर्मितीसाठी वापर करणे,. तसेच याचे उत्पादन प्रती एक्कर २० ते २२ टन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्वीट सोरगम (गोड ज्वारी) पासून उत्पादीत होणारी ताटे कारखाना रू. 2000/- प्रतिटन प्रमाणे खरेदी करण्याचे आश्वासन उपस्थित ऊस उत्पादक शेतक-यांना दिले. अल्पावधीत शेतीमधून जादा उत्पादन म्हणजेच हरभ-या पेक्षा जादा व हमखास नफा मिळवून देणारे हे गोड ज्वारीचे पीक असल्याची संकल्पना मांडली.
या कार्यक्रमात युपीएल/अॅडव्हांटा कंपनीने गोड ज्वारी संदर्भातील त्यांनी विकसीत केलेल्या विविध जातींचे प्रदर्शन केले व त्यांचे एजीएम श्री.पांडुरंग पाटील यांनी गोड ज्वारी पिका बाबत सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक कृषिभषण पांडूरंग आवाड यांनी तर उपस्थितांचे आभार संचालक संभाजी रेड्डी यांनी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !