ऊस, सोयाबीनच्या हमीभावासाठी स्वाभिमानीची नवरात्र जणजागर यात्रा सुरु


ऊस, सोयाबीनच्या हमीभावासाठी स्वाभिमानीची नवरात्र जणजागर यात्रा सुरु 
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४ हजार रुपये, सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, पीक विमा मिळावा, दुष्काळ जाहीर करून अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर मागण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तुळजापूर तालुक्यातील शहापूर, गुजनूर, निलेगाव, खुदावाडी, दहिटणे, गुळहळ्ळी आदी गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली आहे. ऊसाला किमान साडेतीन ते चार हजार प्रती टन भाव मिळाला पाहिजे. तर सोयाबीन काढणी खर्च व इतर खर्च मिळून उत्पादनाच्या दुप्पट खर्च होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रती क्विंटल जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच शहापूर येथील शेतकरी नागनाथ सावकार, दिनेश जगताप, दत्ता व्हंताळे यांनी जोपर्यंत कारखाने एफआरपी जाहीर करत नाहीत. तोपर्यंत ऊस देणार नसल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च व शेतकऱ्याना सध्या मिळत असलेला भाव यात मोठी तफावत आहे. असेच चालू राहिले तर आत्महत्यांचे प्रमाण वाढत जाईल आणि शेतकरी कधीच फायद्यात राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे व शासन दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात नवरात्रीनंतर ऊस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी तीव्र  रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

शेतकरी जनजागर यात्रेत हक्काचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. अशी मागणीही जोर धरत आहे. इंगळे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या भावना या सरकार दरबारी पोहोचणार याची ग्वाही देऊन ऊस व सोयाबीनला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल याबाबत जिल्हाभरात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लवटे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मकबूल मुल्ला, प्रगतशील शेतकरी भास्कर सुरवसे, नागनाथ सुरवसे, विभागीय अध्यक्ष युवराज नवाडे, शहापूर येथील शेतकरी नेते मधुकर लवटे, सुखदेव गोरे, राजेंद्र सुरवसे, गणेश जगताप नसीर पटेल, प्रकाश शिंदे, लक्ष्मण व्हंताळे, परमेश्वर व्हंताळे, शिवाजी जगताप इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !