जावळे पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जावळे पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

लोहारा दि.१६ (प्रतिनिधी) -
शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंत्तीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांनी ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत त्यांचे आत्मचरित्र वाचले तरच युवकांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. तर ग्रंथालय व मराठी विभाग यांच्यावतीने एक व्यक्ती, एक पुस्तक, एक तास वाचन हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. डी.एन. कोटरंगे, डॉ.बी.एस. राजोळे, प्रा.बी.बी. मोटे., डॉ.एम. एल.सोमवंशी, डॉ.एस.एस. कदम,डॉ. आर. एम. सुर्यवंशी, डॉ.एस.व्ही. सोनवणे, डॉ.पी.के. गायकवाड, डॉ.आर.एस. धप्पाधुळे डॉ. व्ही.डी. आचार्य, डॉ.एस.एन. बिराजदार, प्रा.एन.व्ही. अष्टेकर, डॉ.सी.जी. कडेकर, डॉ.पी.व्ही. माने, प्रा.प्रियंका गिरी, प्रविण पाटील, परमेश्वर कदम, संजय फुगटे, यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !