शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मल्टी मीडिया प्रदर्शन उपयुक्त - कुलकर्णी

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मल्टी मीडिया प्रदर्शन उपयुक्त - कुलकर्णी


तुळजापूर दि.२८ (प्रतिनिधी) - केंद्र शासनाचे ९ वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मल्टी मीडिया प्रदर्शन उपयुक्त असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.  

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सोलापूर येथील केंद्रीय संचार ब्युरो व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण व भरड धान्ये आंतरराष्ट्रीय वर्ष २०२३ या विषयांवर आयोजित केलेल्या ३ दिवसीय डिजिटल मल्टि मिडीया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, तामलवाडी टोल प्लाझाचे महाव्यवस्थापक प्रसेनजीत वाघमारे, प्रकल्प व्यवस्थापक दादासाहेब शिंदे, उद्योजक गणेश छ्लानी व सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते.‌ पुढे बोलताना कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी पोलीस प्रशासनाकडून तुळजापूर मंदिर परिसरात करण्यात आलेल्या वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेविषयी कन्नड भाषेतून माहिती दिली. तसेच अधीक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेली मदत केंद्रे आणि वाहतूकीच्या सोयीसुविधा विषयाच्या वीडियो संबधि देखील माहिती त्यांनी दिली. शारदीय नवरात्री उत्सव तथा अश्विन पौर्णिमानिमित तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यातील भाविकांना पौष्टिक भरड धान्ये व केंद्र शासनाने मागील ९ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे व विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अंबादास यादव यानी मानले. हे प्रदर्शन दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर पर्यंत चोवीस तास सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. संपूर्ण प्रदर्शनातील माहिती डिजिटल स्वरूपात असल्याने रात्रीच्या वेळी भाविकांना पाहण्याचे विशेष आकर्षण असणार आहे. तुळजापुरला पायी जाणाऱ्या भाविकांना स्वच्छतेविषयी प्रेरित करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरो तर्फे प्रदर्शनाच्या स्थळी सेल्फी विथ पीएम, सेल्फी विथ क्लीन इंडिया फोटो बुथ ठेवण्यात आले आहे. भाविकांनी आई राजा उदो उदो, सदानंदिचा उदो उदोच्या जयघोषासोबत स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत व ग्रीन भारत यासारख्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तुळजापूर येथील महिषासुर मर्दिनी सांस्कृतिक कला मंडळाचे शाहीर राजेंद्र गायकवाड आणि कलाकारांनी वग आणि लोकगीतांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती उपस्थित भाविकांना दिली. प्रदर्शनच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे.एम हन्नुरे, योगी कोंडाबत्तीन, साईराज, सुरज जाधव, तामलवाडी पोलिस प्रशासन व आयआरबी टोल प्लाझाचे इन्चार्ज प्रवीण सावर्डेकर, प्रशासक अजित खुणे, इलेक्ट्रिशियन तुकाराम सुर्डे, नाना घोटकर, आबा रणसुरे, चंद्रकांत रणसुरे, राजकुमार हब्बू आदींनी परिश्रम घेतले.     


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !