तेरणा महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता ही सेवा
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने शेकापूर हद्दीतील एन.एच. ५२ च्या रोड साईडला दि.१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या मोहीमे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूचे गवत काढणे, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा प्रमोद तांबारे (एनएसएस), प्रा ज्ञानेश्वर निंबाळकर (रेक्टर), एस एस घोगरे (वार्डन), सुरक्षा प्रमुख सरवदे, पाटील (वार्डन) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालयाने एआयसीटीईच्या निर्देशाप्रमाणे दि १ ते दि १५ ऑक्टोबरपर्यत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे. यामध्ये महाविद्यालयाकडून शहर व परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे. तसेच या अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर वडगाव, श्री हातलादेवी मंदिर परिसर, श्री धारासुरमर्दिनी मंदिर परिसर, तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, जवाहर आश्रम शाळा, बावी तांडा या परिसरामध्ये स्वच्छता अभियान व प्लास्टिक निर्मूलन हे उपक्रम महाविद्यालयाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत. तर राबविलेल्या सर्व उपक्रमांचे चित्रे, व्हिडिओ संबंधित वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. माने यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps