शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्तवाहतूक मार्गात बदल
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त
वाहतूक मार्गात बदल
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.१५ ते ३० ऑक्टोबरपर्यंत साजरा होत आहे. दि.२८ ऑक्टोबर रोजी कोजागीरी पौर्णिमा व दि. २९ ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात. नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर व परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत येणाऱ्या मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे निर्देशनास आल्याने दि.२६ ऑक्टोबर रोजीच्या ००.०१ ते दि. २९ ऑक्टोबर रोजीच्या १२ वाजेपर्यंत खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास (Light & Heavy Vehicles) मनाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबादकडे जाणाऱ्या वाहतुकीला धाराशिवपासून तुळजापूर व पुढे नळदुर्गपर्यंत मनाई करण्यात येत आहे. हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहतुकीला नळदुर्गपासून तुळजापूर व पुढे धाराशिवपर्यंत मनाई करण्यात येत आहे. लातूर से सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीला औसापासून तुळजापूर व तामलवाडी पुढे सोलापूरपर्यंत मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते लातूरकडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूरपासून तामलवाडी तुळजापूर पुढे औसापर्यंत मनाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीला येरमाळापासून धाराशिव, तुळजापूर, तामलवाडी व पुढे सोलापूरपर्यंत मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूरपासून तामलवाडी तुळजापूर धाराशिव व पुढे येरमाळापर्यंत मनाई करण्यात येत आहे. तुळजपूर ते बार्शीकडे जाणाऱ्या वाहतुकीला तुळजापूरपासून ढेकरी, गौडगाव व पुढे बाशीपर्यंत मनाई करण्यात येत आहे. बार्शी ते तुळजापूरकडे येणाऱ्या वाहतुकीला बार्शीपासून गौडगाव, ढेकरी व पुढे तुळजापूरपर्यंत मनाई करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.
छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबादकडे जाणारी वाहतुक छत्रपती संभाजीनगर बीड मांजरसुंबा - अंबाजोगाई लातूर औसा उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे पदक्रमण करतील किंवा छत्रपती संभाजीनगर बीड येडशी ढोकी मुरुड लातूर औसा उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे मार्गक्रमण करतील. हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतुक उमरगा औसा लातूर अंबाजोगाई, मांजरसुंबा बीड मार्गे पुढे छत्रपती संभाजीनगरकडे मार्गक्रमण करतील किंवा उमरगा औसा लातूर मुरुड ढोकी येडशी बीड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे मार्गक्रमण करतील. धाराशिव ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे मार्गक्रमण करतील. सोलापूर ते धाराशिवकडे येणारी वाहतुक वैराग मार्ग मार्गक्रमण करतील. लातूर ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक मुरुडपासून ढोकी येडशी बार्शी पुढे सोलापूर या मार्गक्रमण करतील. सोलापूर ते लातूरकडे येणारी वाहतूक सोलापूरपासून बार्शी येडशी ढोकी मुरुड पुढे लातूर मार्गे मार्गक्रमण करतील. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक येरमाळापासून बार्शी पुढे सोलापूर मार्गक्रमण करतील. सोलापूर ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक सोलापूरपासून बार्शी पुढे येरमाळा मार्गे मार्गक्रमण करतील. तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतूक तुळजापूर धाराशिव पुढे बाशी मार्गे मार्गक्रमण करतील. बार्शी ते तुळजापूरकडे येणारी वाहतूक बार्शी वैराग धाराशिव पुढे तुळजापूर मार्ग मार्गक्रमण करतील. तुळजापूर ते सोलापूरकडे जाणारी वाहतूक मंगरुळ पाटीपासून इटकळ बोरामणी पुढे सोलापूर मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूरकडे येणारी वाहतूक सोलापूरपासून बोरामणी इटकळ मगरूळ पाटी पुढे तुळजापूर मार्गे मार्गक्रमण करतील. वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस.टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत. तथापि, दि.२६ ऑक्टोबरच्या ००:०१ वाजल्यापासून ते दि. २९ ऑक्टोबरच्या १२ वाजेपर्यंत तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे.