ओपन इनोवेशन मॉडेल, स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेत तेरणाच्या २४० विद्यार्थ्यांचा सहभाग
ओपन इनोवेशन मॉडेल, स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेत तेरणाच्या २४० विद्यार्थ्यांचा सहभाग
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयसी टी शई- एम आय सी विद्यार्थी नियोजित उपक्रमामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील महाविद्यालय स्तरावर समाज उपयोगी नवकल्पना घेऊन महाविद्यालयाची २४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापकांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थांने नेहमीच नवनवीन संकल्पना असतात. त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक प्रश्नांची उत्तरे मिळतात. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या. यातील काही प्रयोग निश्चितच भविष्यात पथदर्शी प्रयोग म्हणून मान्यता पावतील अशी मला आशा आहे. या स्पर्धेचा मूळ हेतू म्हणजे देशविदेशातील प्रश्ने यशस्वी हाताळण्यासाठी नव्या नव्या संकल्पनांना वाव देण्याचा उद्देश होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्ट ऑटोमेशन, हेरिटेज कल्चर, आरोग्यविषयक, शेतीविषयक, दळणवळण पर्यटन अशा विविध विषयांवर मांडणी करावी अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होती. या अपेक्षेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी ऑटोमेशन क्रॉप प्रोटेक्शन सिस्टीम.म्हणजेच मानवी श्रम आणि अवकाळी पावसापासून फळबागांचे संरक्षण यासाठी नवीन प्रकल्प डेव्हलप करून पर्यावरण पुरक प्रकल्पाचे कसे नियोजन करता येईल याचा विचार करून प्रयोग केले.
हर्बल ड्रग प्रिपरेशन, कोरोना काळात पॅथॉलॉजी लॅबची गरज आणि त्यावर पडलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता ऑनलाइन पॅथॉलॉजी लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली. आज पिकाचे असो की घराचे संरक्षण हा खूप महत्वाचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बॉर्डर सर्वायवत हे नवीन प्रयोग याविषयी त्यांचा प्रोजेक्ट सादर केला. सध्या देशापुढे
प्रश्न म्हणजे पाणी हा असून जल संरक्षण कसे करावे या संदर्भातही मुलांनी आपला प्रयोग सादर केला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. त्यादृष्टीने खेड्यातील शिक्षण पद्धतीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले.
तसेच प्रोजेक्ट रूबी म्हणजेच ऑटोमेशन इलेक्ट्रिक स्केटबोर्डची कल्पना समोर मांडली. ओयायसिस द स्मार्ट वॉटर डिस्पेन्सर विथ ॲप आणि नवनवीन वैशिष्ट्ये, दिवसभर लायब्ररी उघडी ठेवण्याचा अतिरिक्त ताण लक्षात घेता लायब्ररी ऑटोमिशन लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कल्पक कल्पना घेऊन बक्षिसे, प्रमाणपत्र, प्रकल्प अंमलबजावणीच्या संधी व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२०२३ कॉर्डिनेटर डॉ. सुशीलकुमार नाथराव होळंबे , को कॉर्डिनेटर प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.व्ही. एस. बोंदर, प्रा.आर. बी. ननवरे यांनी परिश्रम घेतले.