उमरगा येथे व होऊ द्या चर्चा अभियान रथाचा शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps
उमरगा दि.१ (प्रतिनिधी) - शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) च्यावतीने होऊ द्या चर्चा या अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन शासनाच्या योजना कशा फसव्या आहेत, घोषणा किती खोट्या आहेत ? हे पटवून सांगण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे पूजन करून उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१ ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.
शिवसेना (ठाकरे) च्यावतीने १ ते १२ ऑक्टोबर या काळात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन शासनाच्या योजना कशा फसव्या आहेत, घोषणा किती खोट्या आहेत ? हे पटवून सांगण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. सर्वसमावेशक योजना न राबविता केवळ देखावा केला हे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी होऊ द्या चर्चा अभियान राबविण्यात येत असल्याचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी सांगितले. यावेळी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी तालुकाप्रमुख विजयकुमार नागणे, उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर, सदाशिव भातागळीकर, माजी नगरसेवक मधुकर घोडके, आप्पाराव गायकवाड, सोशल मीडिया शहरप्रमुख दत्तात्रय शिंदे, कैलास शिंदे, बाबा साळुंके, सोनू पांचाळ, सूरज पाटील, सुदर्शन चव्हाण, एस. आर. मुल्ला, खंडू कदेरे, रमेश शिंदे, जोतीबा शिरगुरे, रतन पाटील, सूरज पाटील, निसार मुल्ला, प्रतीक पांचाळ, आकाश गायकवाड, आकाश बिराजदार आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps