जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विद्यामाता हायस्कुलचे वर्चस्व
जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विद्यामाता हायस्कुलचे वर्चस्व
धारशिव दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलवर आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत विद्यामाता हायस्कुलने निर्विवाद वर्चस्व राखत १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांच्या वयोगटातून विजेतेपद पटकाविले आहे.
लातूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विद्यामाता हायस्कुलचे तीन्ही वयोगटातील मुलांचे संघ धारशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. १४ वर्षाखालील गटात अशडन नारल्या, अली सिद्दीकी, १७ वर्षाखालील गटात रॉजर, रॅण्डल व १९ वर्षाखालील गटात अस्मित मिरांडा व आर्यन इंगळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन केले. विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक नितीन जामगे यांनी मार्गदर्शन केले असून शाळेचे प्राचार्य अमोल गोंसालवीस, व्यवस्थापक रॉबर्ट गोंसालवीस, मुख्याध्यापक वेलीरियन पाटील यांनी कौतुक करून मुलाचा गौरव केला.