सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणासाठी नामतालिकातयार करण्यासाठी अर्ज करावेत
सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणासाठी नामतालिका
तयार करण्यासाठी अर्ज करावेत
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ अन्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाची तरतूद आहे. नवीन लेखा परीक्षक नामतालिका तयार करण्यासाठी दि.२३ ऑक्टोबर से ६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवायचे आहेत. लेखा परीक्षक नामतालिकेवर नोंदणीकृत होण्यासाठी सद्यस्थितीत नामतालिकेवर असलेल्या लेखा परीक्षकांची नोंदणी यापुढे देखील कायम राहण्यासाठी इच्छूक असलेले व नव्याने अर्हता धारण करणारे इच्छूक लेखा परीक्षक याप्रमाणे दोन्ही प्रकरांपैकी लागू प्रकारामध्ये संबंधितांना अर्ज करता येतील.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परीपत्रक दि.१६ ऑक्टोबर अन्वये सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणासाठी सन २०२४-२६ या कालावधीसाठी नामतालीका तयार करणेकरीता कृति कार्यक्रम दि.२६ ऑक्टोबर ते २६ डिसेंबर असा कृति कार्यक्रम तयार केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नामतालिकेवर असलेले लेखा परीक्षक व नव्यावे अहर्ता धारण करणारे इच्छूक लेखा परीक्षकांनी दि.२३ ऑक्टेाबर से ६ नोव्हेंबर या कालावधीत नवीन नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज व त्या संदर्भातील आवश्यक ती कागदपत्रे www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपलोड करावीत. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याबाबत कोणतीही अडचण आल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.