येडशी येथे प्राविण्य अकॅडमी समुपदेशनचे उद्घाटन
येडशी येथे प्राविण्य अकॅडमी समुपदेशनचे उद्घाटन
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - तथागत सामाजिक बहुउद्देशीय संस्था ऍण्ड रिसर्च सेंटरद्वारा संचलित प्राविण्य करिअर अकॅडमीचे उद्घाटन येडशी येथे करण्यात आले. यावेळी येडशी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार, जोत्स्ना शिनगारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, भारतीय बौद्ध महासभेचे जि.संघटक विद्यानंद वाघमारे, तालुका संस्कार सचिव अजिनाथ सरवदे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप, धुपाने पूजन करून मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य करिअर अकॅडमीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रशांत पवार, गुरुनाथ शिंदे, बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, आदिनाथ सरवदे, युनुस पटेल, सोमनाथ नागटिळक, प्रा. जोत्स्ना शिनगारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून संस्थेच्या या कौतुक करत आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जागृती फाउंडेशनच्या अध्यक्ष विजय बनसोडे यांनी तर उपस्थितांचे आभार तथागत गौतम बुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था ऍण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी मानले. यावेळी संस्थेच्या समुपदेशिका रेश्मा संतोष कांबळे, वसंत खुणे, प्रवीण निकाळजे, पवन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.