कृषिकन्यांकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत कौडगांव (बावी) येथे मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय व्ही.पी. कॅम्पसमधील ७ व्या सत्रातील कृषिकन्या मोरे अंकिता, लोंढे संजिवनी, पाटील साक्षी, दळवे आकांक्षा, भोसले ऋतुजा, पांचाळ शीतल यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत कृषिकन्यांनी दुधाचे वेगवेगळे पदार्थ (दहि, पनीर, खवा, ताक, लस्सी, लोणी, तूप, आईस्क्रीम, बासुंदी, पेढा) तयार करण्याची माहिती दिली. यामध्ये बासुंदी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ तयार करणे का गरजेचे आहे व त्याची साठवणूक कशा प्रकारे करावी याची माहिती दिली. शाश्वत आर्थिक उत्पादनासाठी प्रक्रिया उद्योगातून कृषि मालाचे मूल्य वाढवणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन करणे महत्त्वाचे नसून, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि कृषी व्यवसाय वाढीसाठी अन्नप्रक्रिया करणे गरजेचे आहे हे सांगण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी कृषीकन्यांना प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. घाडगे एच. एस. कार्यक्रम समन्वयक प्रा. शेटे डी.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.पाटील एस.एन. व विभागप्रमुख प्रा. साठे एम.पी. यांचे मार्गदर्शन लाभले.
- Get link
- X
- Other Apps