हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

 धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - आधारीत फळ पीक विमा योजना पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी आंबे, बहरात, द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा व पपई या पिकांचा समावेश आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणेबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, सात-बारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो व बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे.


 फळ पीक निहाय अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !