सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ऑनलाईन सादर करावी - गुरव
- Get link
- X
- Other Apps
सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ऑनलाईन सादर करावी - गुरव
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - सप्टेंबर अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाद्वारे चालू आहे. सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. विहीत मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक आस्थानेने नोंदणी तपशील देखील नोंदवून आवश्यक ती सर्व माहिती अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सं.रा. गुरव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्या कलम ५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम ५ (२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्या अंतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष व एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वी युजरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ किंवा ई-मेल आयडी osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.
- Get link
- X
- Other Apps