तुळजापूर येथील विकास आराखड्याच्या तारखेत बदल

तुळजापूर येथील विकास आराखडा सादरीकरच्या तारखेत बदल

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसह शहराचा विकास आराखड्यात काही बदल सुचवायचे असतील तर त्यासाठी उद्या दि.११ ऑक्टोबर रोजी सादरीकरण केले जाणार होते. मात्र त्या तारखेत बदल करून दि. १३ ऑक्टोबर ही तारीख ठेवली आहे. दरम्यान, उद्या तुळजापूर बंदची हाक दिल्यामुळे या विकास आराखड्यावरून चांगलाच गोंधळ ऐन नवरात्र महोत्सवामध्ये उडणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर हे महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेले साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ असून देशभरातील लाखो भाविक, भक्तगण हे कुलधर्म, कुलाचार करणेसाठी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात.
श्री तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्र प्राचिन स्मारके, पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 नुसार राज्य संरक्षित स्मारक आहे. राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी मंदिराचा जीर्णौध्दार, मंदिर परिसरातील सुधारणा, सुशोभिकरण आणि शहराचा एकात्मिक विकास आराखडा (DPR) तयार करण्यात आलेला आहे. सर्व नागरिक, भाविक - भक्तांना कळविण्यात येते की, प्रारुप विकास आराखडा सादरीकरण वेळापत्रकामध्ये खालील बदल करण्यात येत आहे.




Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !