जिल्हा विधी प्राधिकरणच्यावतीने दिव्यांगांच्या अधिकार विषयक जनजागरण
जिल्हा विधी प्राधिकरणच्यावतीने दिव्यांगांच्या अधिकार विषयक जनजागरण
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - जिल्हा विधी प्राधिकरणच्यावतीने दिव्यांग व्यक्ती कायदे व अधिकार विषयक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरण समितीच्या अध्यक्षा अंजू एस.शेंडे व दिवाणी न्यायाधिश वरिष्टस्तर एस.एस. माने, जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्यायाधिश वसंत यादव, ऍड.अमोल गुंड, समाज कल्याण विभागाचे चव्हाण, दिव्यांग महामंडळाचे कांबळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष प्रदीप डोके, काशिनाथ शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी अधिकार विषयक जनजागरण करून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनेचे लाभ देखील वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग व्यक्तीसाठी फायदेशीर कार्यक्रम घेतल्याबद्दल प्रहरच्यावतीने जिल्हा विधी प्राधिकरणच्या सर्वांचे आभार मानले. तसेच बालाजी नादरगे यांनी दिव्यांगांना कायदे विषयक व विविध योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, महंमद आतर, श्रीमंत गरड, दत्ता पवार, बाजीराव पाटील, रियाज पठाण आदी उपस्थित होते.