औषध तुटवड्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे) चे जिल्हा रुग्णालयास औषधे भेट देऊन आंदोलन

औषध तुटवड्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे) चे जिल्हा रुग्णालयास औषधे भेट देऊन आंदोलन


धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - 

जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत रुग्णांसाठी लागणारी अत्यावश्यक औषधे भेट देऊन दि.४ ऑक्टोबर रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आरोग्य यंत्रणा हाताळण्यात अपयशी ठरलेले आरोग्य मंत्री सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व धाराशिवच्या मेडिकल कॉलेजसाठी १०० कोटींचा निधी आणल्याचे सांगणारे आ राणाजगजितसिंह पाटील यांनी राजीनामा देऊन घरी बसावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.




शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा औषधे न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना राज्यातील अनेक रुग्णलयात दररोज घडत आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मात्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेष म्हणजे मंत्री सावंत यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर राज्यातील इतर रुग्णालयांची स्थिती काय असेल ? असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केला. तर जिल्ह्याचे नेते म्हणवणाऱ्या भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामासाठी ५ हजार कोटी रुपये निधी आणल्याचे सांगत स्वतःचा सत्कार करवून घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे ते सांगत असले तरी साधी पित्तनाशक गोळी येथे मिळत नसल्यामुळे अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.  जिल्हा शासकीय रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सावंतचं करायचं काय... खाली मुंडकं वर पाय, खोके सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांना अत्यावश्यक औषध गोळ्यांचे बॉक्स पक्षाच्यावतीने देण्यात आले. तर कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रतीक म्हणून पाणी नसलेले शहाळे आरोग्य मंत्री सावंत व वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी डॉ.दोमकुंडवार यांच्याकडे सोपविण्यात आले.  या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, संघटक बापू साळुंके, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, पंकज पाटील, राणा बनसोडे, नितीन शेरखाने, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, अभिराज कदम, नाना घाटगे, निलेश साळुंके, निलेश शिंदे, राकेश सूर्यवंशी, बाबू पडवळ, गफूर शेख, अजिंक्य राजेनिंबाळकर, ओंकार बांगर, संजय भोरे, वैभव वीर, रोहीत कदम, बाळासाहेब वरूडकर, कृष्णा साळुंके, शाहबाज पठाण, अतिक सय्यद, अशोक जाधव, शिवप्रताप कोळी, शिवराज आचार्य, सतीश लोंढे, नवज्योत शिंगाडे, मनोज पडवळ, नितीन राठोड, अभिषेक पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 



रुग्णांसह नातेवाईकही आंदोलनात


शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी व उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे लिहिलेले केसपेपर घेऊन अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यामुळे रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचा थेट पुरावाच मिळाला आहे. औषध पुरवठा सुरळीत न झाल्यास आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा गुरव यांनी दिला.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !