महा डीबीटी शिष्यवृत्ती पोर्टल तात्काळ चालू करण्याची भीम युवा निर्णायकची मागणी
महा डीबीटी शिष्यवृत्ती पोर्टल तात्काळ चालू करण्याची भीम युवा निर्णायकची मागणी
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) शिष्यवृत्ती हा राज्य सरकारचा एक उपयुक्त कार्यक्रम आहे. ते शिष्यवृत्ती पोर्टल लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी भीम निर्णायक युवाच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महा डीबीटी शिष्यवृत्ती शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, आदिवासी विकास विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, तांत्रिक शिक्षण संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी कल्याण विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय विभागासाठी महा डिबीटी शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक विकास विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, कला विभाग संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता, एमएएफएसयु नागपूर विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती
अशा अनेक शिष्यवृत्ती योजना महा डीबीटी पोर्टलवर असतात. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत काही शाखांचे प्रवेश अद्याप पुंर्ण झाले नाहीत. या बाबींकडे शासनाचे लक्ष नाही. ज्या विद्यार्थ्यांचे १० वी, १२ वी तसेच नियमित प्रवेश पूर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी पोर्टल तात्काळ सुरु करण्यात यावेत. त्यामुळे भविष्यात पोर्टलवर ताण येणार नाही. तर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. हे पोर्टल लवकरात लवकर चालू करण्यात यावे. अन्यथा शासनाच्या या गलथान धोरणाच्या विरोधात सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर भीम निर्णायकचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक, विनोद बनसोडे , संतोष मुकुंद बनसोडे, सचिन गायकवाड, बालाजी शितोळे, विशाल डांगे, आनंद गाडे, सुरज सुरते, विष्णू कांबळे यांच्या सह्या आहेत.