वेद शैक्षणिक संकुलामध्ये आयुधांची पूजा
वेद शैक्षणिक संकुलामध्ये आयुधांची पूजा
कळंब दि.२१ (प्रतिनिधी) - शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये सरस्वती व विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे व सर्व हत्यार व साधनांचे पूजन दि.२१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने तर प्रमुख पाहुणे म्हणून नृसिंह ट्रेलर्स व शेती अवजारे फर्मचे उद्दोजक अशोक काटे, योगेश्वरी वेल्डर्स फेब्रिकेशनचे महारुद्र वाघचौरे व सोशल मिडियाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शुभम राखूंडे यांनी मुलाखतीमधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांस उत्तरांतून आयुष्यात यश मिळवता येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी आभार निदेशक विनोद जाधव यांनी मानले. यावेळी प्रा.श्रीकांत पवार, प्रा.मोहिनी शिंदे, निदेशक सागर पालके, निदेशिका कोमल मगर, निदेशिका कल्याणी भराटे, लिपिक आदित्य गायकवाड, सेवक विनोद कसबे यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.