सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा डॉ सावंत यांच्या संकल्पनेचा १ लाख १४ हजार भाविकांना आरोग्यदायी दिलासा !
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा डॉ सावंत यांच्या संकल्पनेचा १ लाख १४ हजार भाविकांना आरोग्यदायी दिलासा !
धाराशिव दि २९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविक भक्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या आरोग्यासाठी तुळजापूर येथे २७ ते ३९ ऑक्टोबर या कालावधीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावर दि.१२ ऑक्टोबरपासून भाविकांना आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. या शिबिरात दि.२८ ऑक्टोबरपर्यंत १ लाख १४ हजार ३२५ भाविकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. यामध्ये ४८ हजार ६१५ महिला तर ६५ हजार ७१० पुरुष भाविकांचा समावेश आहे. त्यामुळे त्या भाविक भक्तांना दर्शनाबरोबरच आरोग्यदायी दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
.........................................................
शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान दि.१२ ऑक्टोबरपासून ६ हजार १८४ भाविकांना आयसीयू हॉस्पिटलद्वारे उपचार देण्यात आले. तर ५४ हजार ३६१ भाविकांना प्रथमोपचार केंद्रामार्फत प्रथमोपचार करण्यात आले. तसेच दुचाकी रुग्णवाहिकेद्वारे ३ हजार ४३७ भाविकांना प्रथमोपचार करण्यात आले. तर आरोग्य दूतांमार्फत ११ हजार ५११ भाविकांना, रुग्ण वाहिकांमार्फत २ हजार ५८६ रुग्णांना उपचार व ३३५ संदर्भित व आंतररुग्ण सेवा ५६४ रुग्णांना देण्यात आल्या. विशेष म्हणजे यात्रा मार्गावरील ३५९ पाणी स्त्रोतांची नियमित तपासणी करून शुद्धीकरण करण्यात आले.
तुळजापूर येथे सोलापूर मार्गावरील घाटशीळ पायथा येथे दि.२७ ते २९ ऑक्टोबर या कालावधी सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य तपासणी, हाडांची, डोळ्यांची, दंत, हृदयरोग, रक्तक्षय, कान, नाक, घसा तपासणी, चष्म्यांचे वितरण, इसीजी व रक्तगट तपासणी आदी सुविधांचा समावेश आहे.
तर दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून एकूण ३५ हजार ५५७ भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यामध्ये १९ हजार ७८२ पुरुष तर १५ हजार ५७५ महिला भाविकांचा समावेश आहे.
...................................
विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत ७ हजार ३४ भाविकांवर उपचार तर ३ हजार २७६ भाविकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच २ हजार २२६ भाविकांची रक्त तपासणी, सोनोग्राफी, टू डी, इको, ईसीजी व इतर चाचण्या करण्यात आल्या. तर ५१९ भाविकांनी डेंटल व्हॅन व मोबाईल मेडिकल युनिटद्वारे एक्स-रे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी आदी सुविधांचा लाभ घेतला आहे.