आकाश कंदील स्पर्धेत १५ विद्यार्थ्यांना बक्षीस

आकाश कंदील स्पर्धेत १५ विद्यार्थ्यांना बक्षीस

धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - जिल्हा संस्कार भारतीच्यावतीने श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालयातील इ. ६ वी विभागात दिपावलीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये २९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी निवडक १५ आकाश कंदीलास बक्षीस म्हणून जलकुंभ प्रशालेचे उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, संस्कार भारती देवागिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ वाघ, पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड, आर.बी. जाधव, डी.ए. देशमुख, के.टी. पाटील फौंडेशन प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आकर्षक आकाश कंदील स्पर्धेसाठी सहशिक्षक रमेश चौधरी, अतुल शेरकर, विश्वास शेवाळे, प्रताप जाधव, हरी मंडोळे, नामदेव कोळी , सह शिक्षिका संगीता शिंदे, व्ही.एल. पवार, एम.पी. ठाकूर, संस्कार भारतीचे अनील ढगे, श्याम भन्साळी, प्रभाकर चोराखळीकर, सुरेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !