फॅशन म्हणून केलेले व्यसन स्वतःसह, कुटूंब व समाजाची बरबादी करते - डॉ तांबारे

फॅशन म्हणून केलेले व्यसन स्वतःसह, कुटूंब व समाजाची बरबादी करते - डॉ तांबारे


धाराशिव दि. (प्रतिनिधी) - प्रत्येक फॅशन ही पुढे व्यसनात रूपांतरित होते. तसाच प्रकार दारूच्या व्यसनात होत असून यामुळे स्वतःसह कुटूंब व समाजाची फक्त आणि फक्त बरबादीच होते असे प्रतिपादन डॉ संदीप तांबारे यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी केले.


धाराशिव शहरातील भोसले हायस्कूलमध्ये समाज कल्याण विभाग व येरमाळा येथील यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी

उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी,

येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक राजेश तामाने, एन,आर.नन्नवरे, एस.व्ही. पाटील, घोडके आदी उपस्थित होते. पुढे

बोलताना डॉ.तांबारे म्हणाले की, दारु पिणे, गांजा, विडी व सिगारेट ओढणे ही व्यसने तर आहेतच. शिवाय मोबाईल हे देखील व्यसन असून ते जाणवत नाही. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे मोबाईल हे कसे व्यसन होऊन जाते‌ ? हे विद्यार्थ्यांसह सर्वांनाच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर उपमुख्याध्यापक कोळी म्हणाले की, व्यसन ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तर व्यसनमुक्त राहावेच. परंतू कुटुंबातील काही मंडळी व्यसन करणारी असतील तर त्यांनी डॉ तांबारे यांच्याकडे समुपदेशन व उपचारासाठी घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  घोडके यांनी तर आभार एन.आर. नन्नवरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !