मराठा व धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - खा. राजेनिंबाळकर

मराठा व धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - खा. राजेनिंबाळकर 

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा व धनगर समाज जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. जातीच्या आधारावर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व धनगर समाज गेल्या अनेक दिवसांपासून मूक मोर्चा, उपोषण व अनेक निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात शांततेने आंदोलन करत आहेत. १९८० पासून मराठा समाज जातीच्या आधारावर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसुचीत जमाती या प्रवर्गामध्ये (एस.टी.) समाविष्ठ करण्यासाठी आग्रही असून धनगर समाजाचे चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज हा भटक्या विमुक्त व अनुसुचीत जमातीमध्ये विभागला असून संपुर्ण धनगर समाजास अनुसूचीत जमाती या प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे यांचे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसले असून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठींबा मिळत आहे. दोन्ही समाजाच्या आरक्षणाची मागणी ही न्याय मागणी असून या समाजास आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून दोन्ही समाजांच्या मागणीला न्याय द्यावा अशी मागणी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !