अजित जुनैदी यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
अजित जुनैदी यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील अजित जुनैदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचा मलंगभाई शेख यांच्या ऑफिसमध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, शफिभाई शेख, मलंग शेख, तीर्थचे उपसरपंच विनोद जाधव, अण्णासाहेब आलुरे, समीर मोरे, पवन व्यवहारे, सालम चिमणे, संदीप धुमाळ, टिपू सुलतान शेख, नासर शेख, सैफ हफिसाब, गोटू दुधाळकर, बसु भंडारकवठे, यारा दस , बालाजी राठोड आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.