लोहारा-अचलेर बस सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद

लोहारा-अचलेर बस सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद  
 

लोहारा दि.३ (प्रतिनिधी) - अचलेर लोहारा बस सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच ही बस सुरू झाल्यामुळे आ ज्ञानराज चौगुले यांचे आभार देखील मानले आहेत.
अचलेर ते लोहारा बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. चौगुले यांच्याकडे केली होती.  बस अचलेर येथे दि.३ ऑक्टोंबर रोजी आली असता ग्रामस्थांच्यावतीने माजी सैनिक मल्लिनाथ रुपनर व माजी सैनिक शंकर वाघमारे यांच्या हस्ते बस चालक, वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी म्हाळसाबाई वाघमारे, माजी सरपंच सुभाष सोलंकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पुजारी, ग्रामपंचायत सदस्य लखन चव्हाण, गुरु बायस, बाबू राठोड, राम जाधव, पपू रुपनर, दिलावर मुल्ला, विष्णू लोहार, नितीन गोपने, अनंत लोखंडे, वसंत कोकरे, गुरव, गणपती घोडके, माने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !