जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - आ. पाटील

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - आ. पाटील


धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या भू-जल पातळीत मोठी घट झाली असून अल्प पर्जन्यमान, तलावातील अत्यल्प पाणी साठा, खरीपातील घटलेले उत्पन्न व रब्बी हंगामातील पेरणीची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्यानुसार त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनास पाठविला आहे.


 धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ ७१ टक्केच पर्जन्यमान झाले असून ऑगस्टमध्ये केवळ २ ते ३  दिवसच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून तालुका कृषि अधिकारी यांच्या अहवालानुसार सोयाबीन पिकाच्या अपेक्षित उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सोयाबीन पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या तरतुदी अंतर्गत २५ टक्के अग्रीम मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे. 

अल्प पर्जन्यमानामुळे भूजल पातळी -१.६४ मीटरने घटलेली आहे, जी मागील वर्षी या महिन्यात १.६८ होती. सर्वसाधारणपणे मे महिन्यात जाणवणारी पाणी पातळी ऑक्टोबरमध्येच आपण अनुभवतोय. तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पात गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ८० टक्के असलेला पाणी साठा आज केवळ १४.३० टक्केच आहे. त्यामुळे या भयावह परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे. शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याच्या विहित कार्य पद्धतीनुसार दुष्काळाची कळ १ व कळ २ हे टप्पे केवळ धाराशिव, लोहारा आणि वाशी या तीन तालुक्यांमध्ये पूर्ण झाले आहेत. मात्र खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली घट, रबी हंगामातील पेरणीची अनिश्चितता, जिल्ह्यातील घटलेली भूजल पातळी व तलावांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता आठ ही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तर जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनास पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन सविस्तर अहवाल शासनास पाठविला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !