शासकीय शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देण्याचा निर्णय रद्द करावा दुधगावकर

शासकीय शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देण्याचा निर्णय रद्द करावा - दुधगावकर 


धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थानच्या अधिनस्थ असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्थ असलेल्या माध्यमांच्या शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देण्यासाठी घेतलेला निर्णय ग्रामीण व शहरी भागातील सामान्य गोरगरीब, मागास, अतिमागास, शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा अधिकारच एक प्रकारे काढून घेण्याची सुरुवातच आहे असे यावरुन स्पष्ट होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना या निर्णयामुळे शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा. अन्यथा या निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !