तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेसाचे उद्घाटन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेसाचे उद्घाटन



धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - भारताला महासत्ता बनवण्यास उद्योजकता विकास आवश्यक असून 

अभियांत्रिकीचे विद्यार्थी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पी आर ऑटोचे प्रमुख संचालक अजिंक्य काळे यांनी केले. येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेसा २०२३ ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचे) उद्घाटन अजिंक्य काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन व विभाग प्रमुख डॉ.डी.डी. दाते उपस्थित होते. पुढे बोलताना काळे म्हणाले की, भारताचा विकास करायचा असेल तर अभियंत्याला केंद्रबिंदू मानून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच भारतातील पायाभूत सुविधा , कुशल कामगार व भारतीयांची कुशाग्र बुद्धिमत्ता जर उद्योगांमध्ये आली तर लवकरात लवकर भारत जगातील एक प्रबळ महासत्ता म्हणून उभा राहील. त्यांनी भारतातील मनुष्यबळाचा वापर हा फक्त कोणत्याही वस्तू भारतातच बनविण्यासाठी झाला पाहिजे. तसेच येथील कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी हे इतरत्र न जाता त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर भारतीयांच्या सेवेसाठीच केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.  स्वतः कसे मोठे व्हायचे ? याविषयी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. तर प्राचार्य डॉ. माने म्हणाले की, मेसाच्या पहिल्याच उद्घाटन कार्यक्रमाला अजिंक्य काळे यांना बोलावून विद्यार्थ्यांना व्याख्यानाची एक उत्तम संधी दिल्याबद्दल त्यांनी विभाग प्रमुखांचे विशेष कौतुक केले. तर विभाग प्रमुख डॉ. दाते यांनी मेसाच्या पदाधिकाऱ्यांची कर्तव्य, जबाबदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !