जुन्या पेन्शनच्या आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघ सहभागी
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - जुन्या पेन्शनसाठी देशभरातील शिक्षक कर्मचा-यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. दिल्लीच्या रामलिला मैदानावर या मागणीसाठी काल अक्षरश: लाखोचा जनसागर लोटला. सेवानिवृत्ती नंतर शिक्षक कर्मचाऱ्यांना वा-यावर सोडणारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो शिक्षक कर्मचारी सामील झाले असून मराठवाडा शिक्षक संघाने आंदोलनात सहभाग घेतला असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
जुनी पेंन्शन कृती समितीने दि.१ ऑक्टोबर रोजी देशभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी रामलिला मैदानावर 'जुनी पेन्शन शंखनाद' आंदोलनाची हाक दिली होती. 'पुरानी पेन्शन बहाल करो' च्या घोषणा देत लाखो शिक्षक कर्मचारी रामलिलावर दाखल झाले. अंशदायी पेन्शन योजना कुचकामी आणि फसवी असल्याने सेवानिवृत्ती नंतर ती शिक्षक कर्मचाऱ्यांना वा-यावर सोडणारी आहे. राज्यकर्ते स्वत:साठी आकर्षक पेन्शन योजना लागू करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करून घेतले आहे. सेवानिवृत्ती नंतर भवितव्य असुरक्षित करणारी नव्या पेन्शन योजने बद्दल शिक्षक कर्मचा-यांच्या मनात तीव्र असंतोष आणि संताप देखील आहे. याच मुद्दय़ावर कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब ,झारखंड,आदि राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देणारांच्या बाजूने शिक्षक कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी रामलिला मैदानावर जमून आपला असंतोष दाखवून दिला आहे. जो पुरानी पेन्शन बहाल करेगा वही देश पे राज करेगा चा नारा संघटनेचे प्रमुख विजयकुमार बंधू यांनी देत या मुद्यावर शिक्षक कर्मचारी सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा इशारा दिला. मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, मार्गदर्शक प्रा. डाॅ. मारोती तेगमपुरे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, बीड जिल्हा सचिव गणेश आजबे, प्रल्हाद वाघ, प्रा. डाॅ. दिलीप फोके, अनिल पाटील, रविराज पाटील यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे एस शेरखाने यांनी दिली.
- Get link
- X
- Other Apps