साडेतीन शक्तीपीठातील हळद-कुंकू, ओटीभरण व घटस्थापनेचे साहित्य घरोघरी देणार भेट

साडेतीन शक्तीपीठातील हळद-कुंकू, ओटीभरण व घटस्थापनेचे साहित्य घरोघरी देणार भेट



धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - देवींच्या साडेतीन शक्तीपीठातून आणलेले हळद-कुंकू, ओटीभरण व घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य घरोघरी वाटपाची परंपरा  यावर्षीही कायम आहे. तर दि.१५ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करुन धाराशिव येथे आणून विधिवत घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती येडेश्वरी देवीचे भक्त प्रशांत साळुंके यांनी दिली. दरम्यान, महिलांसाठी आराधी गीतांचा मेळा,  घागरी फुंकणे, कुंकू मार्चन, सप्तशती पठण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा महिला भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

धाराशिव शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर येथे आराधी, गोंधळी व देवीभक्तांना महाप्रसाद वाटप, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवरात्रोत्सवात आयोजन दरवर्षी करण्यात येत असून यंदाचे हे २३ वे वर्षे आहे. तर यावर्षी साळुंके यांच्यावतीने प्रभाग ४ मधील देवीभक्तांना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवीच्या चरणावरील हळद-कुंकवासह सात धान्य, अगरबत्ती, कापूर, वात आदी साहित्य घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. 



.........

नवरात्र महोत्सव कालावधीत महिला, मुली  व विद्यार्थ्यांसाठी विविध कलांचे प्रशिक्षण तसेच खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, महिला व मुलींसाठी स्व संरक्षणाचे प्रशिक्षण, उद्योग आधार तसेच दांडिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर धावणे, संगीत खुर्ची, रांगोळी, पिठातील चॉकलेट शोधणे, लिंबू चमचा अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !