एकाचा पोहायला घेवून जाऊन दारु पाजून डोक्यात दगडाने मारुन केला खून
एकाचा पोहायला घेवून जाऊन दारु पाजून डोक्यात दगडाने मारुन केला खून
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - एका ३५ वर्षीय व्यक्तीस तळ्यावर पोहण्यासाठी घेऊन गेलेल्या दोघांनी त्या व्यक्तीस दारु पाजून त्याच्या डोक्यात दगडाने घाव करून त्याला जीवे ठार मारले. तसेच त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी त्या दोघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील दिपक नगर तांडा येथील राजेंद्र माणिक राठोड व धाराशिव शहरातील तुळजापूर नाका जवळील पापनास नगर येथील तात्या उर्फ गजनी ऊर्फ राजेश बालाजी कांबळे, या दोघांनी दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी १० ते ७ वाजण्याच्या सुमारास पापनाश नगर परिसरातील कोकाटे यांच्या पाण्याच्या तळ्याजवळ पापनास येथील परमेश्वर मनोहर पाटोळे (वय- ३५ वर्षे) यांना दारु पाजून त्यास कोकाटेच्या पाण्याच्या तळ्यावर पोहण्यासाठी नेले. तेथे गेल्यानंतर परमेश्वर पाटोळे यांच्या डोक्यात दगडाने मारुन जिवे ठार मारले. विशेष म्हणजे त्यांच्या प्रेताची कोठेतरी विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. अशी तक्रार मैना मनोहर पाटोळे, (वय- ४८ वर्षे) यांनी दिली आहे. त्या तक्रारीवरून दि.११ नोव्हेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम- ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.