सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेचे आ काळे यांच्या हस्ते उद्घाटन


सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेचे आ काळे यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - सुनेत्राताई अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ढकल हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उद्घाटन मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर असलेल्या धाराशिव येथे राज्यस्तरीय ढकल स्पर्धेचे आयोजन दि.१४ व १५ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना दीड लाख रुपयांची पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव नगर परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र 
धुरगुडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, कार्यक्रमाचे आयोजक मनोज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, मोहन मुंडे, संदीप बनसोडे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष, बालाजी तांबे, जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, सुहास मेटे, रोहन देशमुख, सुजित देशमुख, प्रा सुशिल शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टॉस उडवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. धाराशिव व खेड या संघामध्ये पहिली स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान दोन्ही टीमच्या खेळाडूंना पाहुण्यांनी हस्तोंदलन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी राज्यातील ६९ टीमनी सहभाग नोंदविला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !