शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त
धाराशिव, दि.१६ (प्रतिनिधी) तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.
तत्पूर्वी पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली.त्यानंतर आरती झाली.यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. १८ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, १९ ऑक्टोबर रोजी ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, २० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.
दरम्यान रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक अश्व वाहनातून काढण्यात आली.