महामार्ग करा मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे भाव द्या - खा राजेनिंबाळकर
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातून भारत सरकारच्या भारत परीमाला योजने अंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून महामार्ग भुसंपादन प्रक्रिया सुरु आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी व समस्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करुन महामार्ग करा. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे भाव द्यावा अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१९ ऑक्टोबर रोजी केली.
या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी भुसंपादित प्रकरणा संदर्भात काही तक्रारी व समस्या असून त्या तक्रारी निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये असलेल्या नियोजन विभागाच्या सभागृहात शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक कदम आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातून सुरत-चेन्नई हा महामार्ग जात असून या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या भारत परीमाला योजनेचा भाग असून पश्चिम- दक्षिण भारतामध्ये थेट संपर्क निर्माण करुन दळणवळण सोयीस्कर करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात येणारआहे. या महामार्गासाठी संपादित केलेली जमीन ही राज्य शासनाच्या सक्तीच्या भुसंपादन कायद्यांतर्गत भुसंपादित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यासाठी संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाप्रमाणे देण्यासाठी शेतकऱ्यांकडून थेट खरेदीचे प्रस्ताव व संमती देण्याबाबतच्या सुचना केल्या. शेतकऱ्यांनी या भुसंपादित जमिनीचा मावेजा थेट खरेदीव्दारे देण्याची मागणी केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या भुसंपादनासंबंधी तक्रारी आहेत अशा शेतकऱ्यांचे पुर्नसर्वेक्षण करुन पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. बागायती जमिनीमध्ये जलसिंचनाचे स्त्रोत जसे विहीर, बोअरवेल, पाईपलाईन आदी पंचनाम्यात ग्राह्य धरुन मावेजा देण्यासाठी तरतूद करावी. तसेच शेतीमधील फळझाडे, सागवान, चंदन आदी झाडांचा मावेजा देण्याच्या सुचना दिली. ज्या शेतकऱ्यांच्या मध्य भागातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. अशा शेतकऱ्यांना महामार्गावरती ॲक्सेस देवून ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ कमी नोंदवले गेले आहे, त्या शेतकऱ्यांचे शेतीचे पुर्नसर्वेक्षण करुन क्षेत्रफळ दुरुस्त करावे, अशा सूचना भुसंपादन विभागाने स्विकारल्या. यावेळी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps