आज तुळजापूर येथे जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
आज तुळजापूर येथे जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यात करण्यात येत आहे. दि.१९ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान,
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शिवपार्वती मंगल कार्यालय, धाकटे तुळजापूर रोड येथे दि.१९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाची सर्व तयारी केली आहे. दि.१९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील महसुली विभागाची मुख्यालये व साडेतीन शक्तीपीठे असलेल्या ठिकाणी महिलांसाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाची सर्व तयारी केली आहे. या कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिला विषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.