चालुक्य यांच्या हस्ते भाविकांसाठी अन्नछत्राचा प्रारंभ

चालुक्य यांच्या हस्ते भाविकांसाठी अन्नछत्राचा प्रारंभ



उमरगा दि.२६ (प्रतिनिधी) - शहरातील बालाजी नगर भागातील राम मंदिर समितीच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावरून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्राचा प्रारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते दि.२६ ऑक्टोबर रोजी करण्यात आला.     
गेल्या ५ वर्षांपासून या समितीतील सदस्यांच्यावतीने तुळजाभवानीला जाणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र व्यवस्था पौर्णिमेपर्यंत ३ दिवस केली  जाते. प्रारंभी तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन संताजी चालुक्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, बळी पवार आदी उपस्थित होते. पौर्णिमेपर्यंत २४ तास ही अन्नदानाची व्यवस्था सुरु ठेवली जाते. यावेळी  सुनील तोरणेकर, उमेश स्वामी, धर्मराज जाधव, शाम काळे, किरण गायकवाड, प्रशांत गायकवाड, फिरोज पटेल, रियाज शेख, युवराज सोमवंशी, दत्ता पांचाळ, बडे भाई आचारी व किशोर जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !