श्री तुळजाभवानी देवीची प्रक्षाळ पूजा
- Get link
- X
- Other Apps
श्री तुळजाभवानी देवीची प्रक्षाळ पूजा
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री. तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ. तत्पूर्वी पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. या पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आले. त्यानंतर धूपारती करण्यात आली. तसेच रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात येऊन प्रक्षाळ पूजा करण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps