रोटरी क्लबच्यावतीने दोन दिवसीय दांडिया नाईटचे आयोजन

रोटरी क्लबच्यावतीने दोन दिवसीय दांडिया नाईटचे आयोजन


धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - नवरात्र महोत्सवानिमित्त रोटरी क्लब व ओस्ला ओऍसीस लेडीज फाउंडेशन यांच्यावतीने शुक्रवार-शनिवार दि.२० व २१ ऑक्टोबर रोजी समर्थ मंगल कार्यालयात संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दांडिया नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिलांच्‍या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दांडिया नाईट कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप दांडीया, दांडीया क्विन, उत्कृष्ट वेशभुषा, लकी ड्रॉ अशा अनेक माध्यमांतून विविध प्रायोजकांच्यावतीने बक्षीसे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत. त्यामुळ सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !