ग्रामीण पोस्टमनांचा विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - ग्रामीण भागात पोस्टमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जीडीएस समितीने शिफारस केलेल्या १२, २४, ३६ सर्व वरिष्ठ जीडीएस ना अतिरिक्त वेतन वाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी देशव्यापी संप करण्यात आला. तर धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी तसेच जिल्हा मुख्यालयात समोर या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप करून जिल्हाधिकाऱ्यामार्फत केंद्रीय मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दि.४ ऑक्टोबर रोजी दिले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जीडीएस कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावे. तर विभागीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता आदी सुविधा लागू कराव्यात, डॉ कमलेश चंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे उदा. टीआरसीए १ जानेवारी २०१६ पासून सीनियर, जूनियर बॅचिंग १२, २४, ३६ प्रमोशन, ग्रुप विमा ५ लाख, ग्रॅज्युएटी ५ लाख, १८० दिवस रजा व रोखीकरण, कुटुंबासहित वैद्यकीय सुविधा, एसडीबीएह वर्गणी ३ ते १० टक्के पेन्शन, पदाच्या कामानुसार नवीन जीडीएसला नवीन टीआरसीए देण्यात यावा, सर्व बीपीएमला बॅगांची ने-आण, कॅश कन्व्हेन्स आधी अतिरिक्त कामाचा सीडीए देण्यात यावा, अविवाहित कामाच्या उद्दिष्टासाठी व जीडीएसला मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्या इच्छे विरुद्ध फेसबुक, इंस्टाग्राममधून कामासाठी करण्यात येत असलेली सक्ती थांबविण्यात यावी, कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांनाच अनुकंपा नोकरी देण्यात यावी, प्रभावीपणे काम करण्यासाठी बीओमध्ये आरआयसीटी डिव्हाईस ऐवजी लॅपटॉप, प्रिंटर व ब्रॉड बँड नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर रामचंद्र उंबरे, डी.पी. भास्कर, डी.बी. घोडके, यु.एम. झाडे, टी.एम. पांचाळ, एम.एम. पठाण, व्ही.टी. धावारे, किसन जावळे, एस.ए. साडेकर, एन आर. तांबोळी, त्रिमुखे, सुनील राऊत आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps