सचिन सरवदे यांचा निवडीबद्दल सत्कार
सचिन सरवदे यांचा निवडीबद्दल सत्कार
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सचिन सरवदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, महेश नलावडे, केशेगाव जि.प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, राजू दसाडे, गोरोबा चौगुले, कालिदास मुरकुटे, नितीन सरवदे, चंद्रकांत दसाडे, सुनील मते, मंगेश सरवदे, रामेश्वर सरवदे, नितीन शेळके आदी उपस्थित होते.