राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आदित्य जाधव प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आदित्य जाधव प्रथम

  
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आदित्य शाम जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये अजित पवार यांच्या हस्ते रोख २१ हजार रूपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र  देऊन जाधवच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आयोजिका ऍड.संध्या सोनवणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय युवती अध्यक्षा ऍड.संध्या सोनवणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात आदित्य जाधवने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअरच्या वाटा या विषयावर निबंध अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्यामुळे त्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे. याबद्दल बालाजी झोंबाडे, कलीम शेख, तुकाराम चांदणे, रोहित आडसुळ, नानासाहेब झोंबाडे, आकाश रसाळ, रोहन शेंडगे, रोहन आडसुळ, सचिन रसाळ, सुयश झोंबाडे, दादा रसाळ, प्रा.शिवाजी गायकवाड, कृष्णा जाधव, प्रा.सुवर्णा आंबेकर, सिध्देश्वर वाघमोडे, प्रविण मंजुळे, समर्थ राजगुरू, ओमकार झाल्टे यांनी पेढे भरवून अभिनंदन केले आहे.

..............



घरचा उदरनिर्वाह  भागविण्यासाठी मी दिवसभर राबते. एकवेळ पोटाला चिमटा घेते. पण, जमेल तसे पोरांना शिकवते. त्यालाही गरीबीची जाण आहे. म्हणून तो हाती पडेल ते काम करतो. चांगला अभ्यास करतो. रात्री उशिरापर्यंत लिहितो आणि वाचतो. आज माझ्या लेकराला कसला तरी पुरस्कार मिळाला, हे ऐकून लय आनंद झाला. माझ्या कष्टाचे लेकराने सोने केले, असे सांगताना आदित्यच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !