आकाश कंदील स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

आकाश कंदील स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इ.५ वी वर्गात दिपावलीनिमित्त प्रथम सत्र परिक्षेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेमध्ये २२० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
कार्यानुभव शिक्षिका पी.डी. परतापुरे, कलाध्यापक शेषनाथ वाघ यांच्या परिक्षणाने अनुक्रमे ४ क्रमांक निवडण्यात आले. यामू प्रथम क्रमांक ऋषीकेश सुपुते ५ वी (जी), द्वितीय क्रमांक आयुष येळवे तुकडी ड तृतीय क्रमांक अंकिता लुकेश चव्हाण तु. ई उत्तेजनार्थ वैष्णवी नाना क्षिरसागर या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, इ . ५ वीचे पर्यवेक्षक डी.ए. देशमुख, इ. ६ वीचे पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड, ७ वीचे पर्यवेक्षक आर.बी. जाधव यांच्या हस्ते पॅड व पेन देऊन सत्कारत करण्यात आले. तसेच आकर्षक २४ आकाश कंदील तयार केलेल्या विद्यार्थ्यांना देखील पॅड व पेन देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डी.व्ही. ओव्हाळ, एस. एस. मोहिते, ए.आर.बोपलकर,सौ.एस.व्ही .लोकरे , एस.डी. बीरगड, एस.एम. राऊत, एस.डी. गायकवाड, एम.पी. पवार या शिक्षकांनी परिक्षम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !