कृषीकन्यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट

कृषीकन्यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी शिवारातील गडपाटी येथील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारातील गडपाटी येथील कृषि महाविद्यालयातील ७ व्या सत्रातील कृषिकन्या अंकीता मोरे, संजिवनी लोंढे, साक्षी पाटील,आकांऊ दळवी, ऋतुजा भोसले, शितल पांचाळ यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत त्यांनी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी मान्सूनचा पाऊस आल्यानंतर काही दिवसांतच पेरणी सुरू होते. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज भासते. तर पीक कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, हे पीक कर्ज मिळवायचे कसे ? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ? या संबंधित आवश्यक ती माहिती सविस्तरपणे कृषीकन्यांनी जाणून घेतली. बँकेतून कर्ज काढताना शेतकऱ्यांना येणाऱ्या सामान्य त्रुटी समजून घेऊन त्या कशा टाळता येतील ? याबद्दल आवश्यक माहिती घेतली व त्या प्रकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषिकन्यांना कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. भालेकर  एस.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रात्यक्षिकासाठी प्रा.डॉ. क्रांतिकुमार पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. एच.एस. घाडगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. डी एस शेटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !