आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- Get link
- X
- Other Apps
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - शेतीच्या कारणावरुन विकास त्रास दिल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील राघुचीवाडी येथील दादाराव साधु करवर (वय ६५ वर्षे) यांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील पिंपरी (बे) शेत शिवारातील लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. राजेंद्र हनुमंत बेलदार, अजीत हनुमंत बेलदार, मनोज हनुमंत बेलदार व गणेश हनुमंत बेलदार यांनी मयत दादाराव करवर यांना मागील ६ महिन्यांपासून शेतीच्या कारणावरुन मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या जाचास व त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा नानासाहेब दादाराव करवर यांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
.
- Get link
- X
- Other Apps