आर.पीच्या डी.फार्मसी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आर.पीच्या डी.फार्मसी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी गडपाटी येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत, पालक मेळावा, ओरिएंटेशन कार्यक्रम व गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे एरिया सेल्स मॅनेजर जावेदखान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये यश संपादन केलेल्या डी. फार्मसी द्वितीय वर्षातील राधिका पाटील, मनोहर कुटे, तेजश्री पवार तर प्रथम वर्षातील बागवान बुशरा, बागवान आल्फिया व अपुणे अंजली महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत प्रीती काळे, कल्पना मुळेकर, इरशाद औटी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक व निबंध स्पर्धेत शीतल माळी, बुधवंत गंगासागर व स्मिता घाडगे या अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जावेदखान पठाण यांनी फार्मसी क्षेत्रामधील विविध कोर्सेस व त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फार्मसी क्षेत्रात भारत देश अग्रेसर असून भविष्यात फार्मसी मार्केटिंग या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून स्वतःचे करियर घडवून पालकांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले. तर डी फार्मसी विभाग प्रमुख प्रा. सुबोध कांबळे यांनी डी.फार्मसी अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सर्व विषयांची व परीक्षा पद्धती, महाविद्यालयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
स्वागत समारोह कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामधून डी.फार्मसी प्रथम वर्षातील रुचा शेळके मिस फ्रेशर तर समाधान नाईकवाडी मिस्टर फ्रेशर या बहुमानाचे मानकरी ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सिद्धी बसाते व प्रा.प्रसाद वारे यांनी तर सूत्रसंचालन आदित्य मटे, अंजली अपुणे, हमजा मणियार व कल्पना मळेकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अमोल मोरे, प्रा.वैभव रेडे, प्रा. रितिका पाटील, प्रा.अमर माने, शिक्षकेत्तर कर्मचारी अभिरुद्र सुतार, प्रवीण चेंडगे, देशमुख व डी. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.