वरवंटी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी
- Get link
- X
- Other Apps
वरवंटी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वरवंटी शिवारात दि.३० सप्टेबर रोजी सायं ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास गायीच्या वासराला फाडून त्याचा फडशा पाडला. दि.१ ऑक्टोबर रोजी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता बिबट्यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. तर त्या वासराचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शव विच्छेदन केले व घटनेचा पंचनामा, पशुधन मालकाचा जवाब नोंदविला. तसेच दि.२ ऑक्टोबर रोजी वन कर्मचारी यांच्या समवेत पाहणी केली असता त्या मृत वासराचे शरीर वरवंटी येथील फॉरेस्ट गट क्र.१०७ या दुसऱ्या ठिकाणी ओढत नेऊन खाल्ल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्या दिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आली. तर सायंकाळी मृत वासराच्या शरीराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यामुळे वरवंटी, कामठा, अपसिंगा, गावसुद, वडगांव व इतर गावात खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचाऱ्यांना तैनात केले असून सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहून शेतात रात्री- बेरात्री मुक्काम न करण्याचा, साथ सलोख्याचे नियम पाळून, समुहाने, गटाने शेतीकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करु नये. लहान मुलांना एकट्याने न फिरु देणे, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधणे तसेच सोशल मिडीयावर जी कोणती व्हिडीओ क्लिप बिबट्या संदर्भात आली आहे. ती आजपर्यंतची बिबट्याची अनधिकृत असून इतर प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवु नये. बिबट्या वन्यप्राण्यासारखा प्राणी आपणास आढळल्यास त्याची प्रथमतः वन विभाग, गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना कळवावे व अफवा पसरण्यापासून दूर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राण्यांची होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन विभागीय वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps